Tuesday, March 26 2019 1:41 pm

इंधनची किंमत तडाडली

नवी-दिल्ली-:  गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने घसरण होत होती. 7 जानेवारी रोजी मुंबईत पेट्रोल 20 पैशांनी स्वस्त झालं होतं. त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी 74.16 रुपये मोजावे लागले. तर डिझेलच्या दरातही 7 पैशांची घट झाली होती. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 65.12 रुपयांवर आला होता. तसेच दिल्लीतही इंधनाचे दर घटले होते. दिल्लीतही पेट्रोल 20 पैशांनी स्वस्त झालं.

त्यामुळे एक लिटर पेट्रोलसाठी 68.50 रुपये मोजावे लागले तर डिझेलच्या दरात 7 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर 62.24 रुपयांवर आला होता.गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत होती. मात्र दर कपातीनंतर आता पुन्हा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे.