Monday, January 27 2020 9:11 pm

आशिष शेलार यांनी विरोधी पक्ष शून्य असल्याची केली टीका

ठाणे : विशेष म्हणजे शरद पवार यांना जर ३७० कलमाचा निर्णय अयोग्य वाटत असेल तर त्यांच्या पोटात काय दुखले असा प्रश्न देखील आपण पवार यांना विचारू असेही शेलार यांनी सांगितले. केळकर याना निवडून देण्याचे आवाहन करताना त्यांनी मनसे आणि राष्ट्रावादी पक्षावर देखील सडकून टीका केला आहे . एक शून्य दुसऱ्या शून्यात गेला कि त्याची बेरीकी शून्यच येणार असल्याचा टोला त्यांनी मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे . ३७० कलम संदर्भात बोलताना शरद पवार आणि इम्रान खान यांची भूमिका एकच असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे .

 

ठाण्यात ठाणे विधानसभेचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचार निमित्त तसेच भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यभर पक्षाची भूमिका मांडली जात असल्याने याचाच भाग ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करण्याकरिता शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी शेलार यांनी भाजपा -शिवसेना युतीच्या सरकारच्या विविध कामांची माहिती दिली. सर्वच विरोधीपक्ष महायुतीसमोर आपले नशीब आजमावत असल्याचे त्यांनी सांगितले. आज जाणते राजे शेतक:यांचा मुद्दा घेऊन फिरत आहेत. पण त्यांच्या वयानुसार त्यांची वर्तणूक हवी होती. पण ते खोट बोलत फिरत असल्याचा टोलाही त्यांनी शरद पवार यांचे नाव घेता लगावला. जसे आम्ही शेतक:यांच्या कर्जाचे आकडे जाहीर केले. तसे शरद पवारांनी किती शेतक:यांचे पैसे बँकेत बुडवले याचे आकडे जाहीर करावे. जेव्हा त्यांचे सरकार होत तेव्हा त्यांनी किती शेतक:यांचे कर्ज माफ केले. असा सवाल करत पवार यांनी फक्त सहकार बॅंकेचे भले केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 1 लाख 67 हजार शेततळी आणि विहिरी आपण या राज्यात दिले, आघाडीच्या काळातील त्यांनी त्यांची आकडेवारी सांगावी असे थेट आव्हान त्यांनी आघाडीला दिले. मराठवाडा या भागात गेल्या अनेक वर्षे दुष्काळ पाहिला या भागात देखील भाजप कडून प्रयत्न करण्यात आले. अनेक प्रकल्प आणि बेघराना घरे दिली, ग्रामीण भागात विकास कामे केली, आरे बाबत न्यायालयाने निर्णय दिला आहे त्या बाबत मी काही बोलू इच्छित नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर रामजन्म भूमी युतीचा वचनामा प्रमाणो युती सरकार पूर्ण करेल हा पुर्नरुच्चार देखील त्यांनी केला.