Thursday, December 12 2024 7:58 pm

आरटीओ अंतर्गत २०२३-२४ घ्या मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू

*ठाणे शहरात पहिलीसाठी २६३८ जागा*

*ज्युनिअर केजीसाठी १३४ जागा*

*नर्सरी साठी १२० जागा*

*ठाणे ०७ :* ठाणे महापालिका क्षेत्रातील १२७ पात्र शाळांमधील सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्क्यांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. महापालिका क्षेत्रातील २८९२ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया होत आहे.

आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश अंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून https://student.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर १७ मार्च २०२३, रात्री बारा वाजेपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पालकांनी या पोर्टलवर नर्सरी, ज्युनिअर केजी, तसेच इयत्ता पहिलीसाठी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी सहा वर्षे पूर्ण, सिनियर केजीसाठी पाच वर्षे पूर्ण, ज्युनिअर केजीसाठी चार वर्षे पूर्ण अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

पालकांसाठी मदत केंद्रांची यादी, ऑन लाईनप्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका, आवश्यक कागदपत्र इत्यादीबाबत सर्व माहिती शासनाच्या वरील वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

सदर प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त बालकांच्या अर्जांची नोंदणी करून सदर सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेशासाठी लागणारी सर्व कागदपत्रे ही ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावी. तसेच, बालकाचे आधार कार्ड रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आरटीई प्रवेश पात्र सर्व बालकांसाठी आवश्यक आहेत, याचीही पालकांनी नोंद घ्यावी.