Tuesday, July 23 2019 2:07 am

आयोध्या वाद : सुनावणी ३ महिन्यानंतर

नवी दिल्ली : रामजन्मभूमी बाबरी मशीद या वादग्रस्त प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तहकूब केली असून पुढील सुनावणी जानेवारीमध्ये होईल असे जाहीर केले. अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणाऱया याचिकांवर आता सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे .पुढच्या वषी कधी सुनावणी घेण्यात येईल याची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

३० सप्टेंबर २०१० ला ह्या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त जमिनीवर मशिदीच्या अगोदरपासून रामजन्मभूमी असल्याचे मान्य केले होते आणि मशिदिला एक ततृतीयांश जागा दिली होती तर तीन गटात ही जमीन विभागण्याची निर्णय दिला होता .मात्र ह्या निर्णयानंतर सर्वांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती तेव्हा पासून ह्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे .