मुंबई, 20 मागील काही दिवसांपासून एनआयए पथकाने देशभरात कारवाईचा धडाका लावला आहे. एनआयएने सोमवारी महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये छापे टाकले. एनआयएने केलेल्या छापेमारीत आठ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. सर्व आरोपींच्या विरोधात एनआयएने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच छापे टाकून अनेक केमिकल्स, सशयास्पद कागदपत्रे, रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील अमरावती, पुणे, मुंबई व कर्नाटकात, दिल्ली व झारखंड राज्यात एकूण १९ ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये आठ जणांना अटक केली आहे. यामध्ये आयसिसच्या आणखी एका म्होरक्याचा समावेश आहे. मिनाझ ऊर्फ सुलेमान नावाचा आरोपी या सर्वांचा म्होरक्या होता असा एनआयएने दावा केला आहे. अटक केलेले आरोपी आयसीसच्या संपर्कात होते तसेच आयसीसला प्रमोट करत होते असा एनआयए दावा केला असून तपासात निष्पन्न झाले आहे.
एनआयएने योजना उधळून लावली
एनआयएने आयईडी स्फोट घडवण्याची आयसिस बल्लारी मॉड्यूलची योजना उधळून लावली. एनआयएने ४ राज्यांमध्ये छापे टाकून मॉड्युल हेडसह ८ दहशतवाद्यांना अटक केली. स्फोटक कच्चा माल, शस्त्रे, दहशतवादी योजनांचा पर्दाफाश करणारी कागदपत्रे या कारवाईत जप्त केली आहेत. आयएसआयएसवर पहाटेच्या कारवाईत, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी चार राज्यांमधील १९ ठिकाणी छापे टाकले आणि बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या बल्लारी मॉड्यूलच्या ८ कार्यकर्त्यांना अटक केली, ज्यात त्याचा नेता मिनाझचा समावेश आहे, अशा प्रकारे आरोपींचे योजना निष्फळ ठरवली.