Wednesday, February 26 2020 8:20 am

‘आयत्या बिळात चंदूबा…’ चंद्रकांत पाटील विरोधकांच्या निशाण्यावर

पुणे :-  ‘आयत्या बिळात चंदूबा…’ अशी म्हण तयार करूनराष्ट्रवादी काँग्रेसनं आज एका जुन्या मराठी म्हणीचं विडंबन करून पाटलांवर हल्ला चढवला आहे. विधानसभा निवडणुकीचे मतदान दोन दिवसांवर येऊन पोहचले असून वर्तमानपत्रे, मोबाइल, टीव्ही वाहिन्यांसह सोशल मीडियातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून लढणारे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. आयत्या बिळात नागोबा या म्हणीत फेरफार करून’आयत्या बिळात चंदूबा…’ असं त्यात नमूद करण्यात आले आहे. मूळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकांत पाटील भाजपसाठी अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. सुरुवातीला येथील ब्राह्मण समाजातून त्यांच्या उमेदवारीस मोठा विरोध झाला होता. मेधा कुलकर्णी यांनी बांधलेला मतदारसंघ त्यांना सहज मिळाल्याची स्थानिकांची भावना होती. कुलकर्णी यांचे कार्यकर्ते व भाजपच्या पाठीराख्यांचा हा विरोध आता मावळला असला तरी विरोधक पाटील यांची पाठ सोडायला तयार नाहीत.