ठाणे 10 – आमदार संजय केळकर यांच्या ‘संजय फाउंडेशन’ मार्फत ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथील सफाई कामगारांच्या पेटीवर “एक फराळ स्वच्छता दुतांबरोबर…आपल्या सफाई कामगारंबरोबर” हा उपक्रम घेण्यात आला. आ. केळकर यांनी स्वतः सफाई कामगारांना फराळ देऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. “सफाई कामगार हे ‘स्वच्छता दूत’ असून शहरातील एक महत्वाचा घटक आहे.. शहर स्वच्छ करण्यात त्यांचा मोलाचा वाटा शहर”….दर वर्षी मी या स्वच्छता दुतांबरोबर दिवाळीच्या पहिल्या दिवशी फराळाचा आनंद घेतो आणी दिवाळीच्या शुभेच्छा देतो.. असे आ. केळकर यांनी बोलताना सांगितले तर स्वतः आमदार आमच्या करिता दरवर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी फराळ घेउन येतात, आमच्यासोबत फराळ करतात याचा आनंद तर आहेच पण समाधान पण आहे. आणी नेहमीच आ. केळकर यांनी आमच्या कामाकरिता, अडचणी सोडविण्याकरिता पुढाकार घेतला आहे. आमच्याकडे कोणाचे तरी लक्ष आहे हे आमच्यासाठी महत्वाचे आहे अशी भावना एका सफाई कामगाराने बोलताना व्यक्त केली. या कार्यक्रमाचे आयोजन विशाल वाघ यांनी केले होते. यावेळी या कार्यक्रमाला राजेश गाडे, विशाल वाघ, सौ. उशा विशाल, प्रदीप जाधव, महापालिका अधिकारी व कामगार वर्ग उपस्थित होता.