Monday, March 8 2021 5:44 am

आमदार राम कदम यांचे ‘तांडव ‘

मुंबई : ‘तांडव’ या वेब सिरीजमध्ये देवतांचा अपमान करण्यात आल्याने भाजपचे आमदार राम कदम यांनी निर्मात्यांविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. अली अब्बास तांडव वेब सीरिजचा दिग्दर्शक असून डाव्या विचारसरणीच्या अजेंड्याला प्रोत्साहन देत आहे. झीशानने स्टेजवर भगवान शिवाचा अपमान केला आहे. अभिनेता सैफ अली खान याची ही वेब सिरीज आहे. राम कदम यांनी या तक्रारीत म्हटले आहे की, या वेब सिरीजमध्ये देवतांचा अपमान करण्यात आला आहे. त्यामुळे या वेब सिरीजचे निर्माता, दिग्दर्शक आणि यात काम करणारे कलाकार यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.