Sunday, September 15 2019 4:01 pm

आपत्कालीन परिस्थितीत अधिकारी कर्मचा-यांनी सतर्क रहावे – अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे

ठाणे :- पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती कधीही निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्व महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी सतर्क रहावून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे शहरातील काही भागात साचणाऱ्या पाण्यावर तत्काळ निवारण करण्यासाठी त्या ठिकाणी तातडीने उपाययोजनाकराव्यात, तसेच ज्या भागात कामे सुरु आहेत. त्या ठिकाणी नागरिकांना कोणताही त्रास न होता  तो परिसर संरक्षित करुन कामे करावीत. पावसामुळे शहरात कोणतीही जीवितहानीव वित्तहानी होणार नाही यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने सुरू करावी अशा सूचना महापालिका आयुक्त श्री. संजीव जयस्वाल यांच्याआदेशानुसार अतिरिक्त आयुक्त श्री. समीर उन्हाळे यांनी काल झालेल्या बैठकीत दिल्या

पावसामुळे ज्या डोंगराळ भागातून वाहून आलेला कचरा हा नाल्यातून तातडीने काढण्यात यावा, पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडल्यास तेतातडीने बुजविण्यात यावे. ज्या खोलगट भागात पाणी साचते तेथे आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. रस्त्यावरील चरांचे पुर्नपृष्ठीकरणकरण्यात यावे जेणेकरुन पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडणार नाही अशा सूचना देखील या बैठकीत देण्यात आल्या. ज्या ठिकाणीमेट्रोच काम सुरू आहे त्या ठिकाणी बॉरिगेटिंगमुळे पाणी अडणार नाही यासाठी विशेष काळजी घेण्यात यावी. वा-यामुळे रस्त्यावर पडलेल्याझाडांच्या फांद्या या तात्काळ उचलण्यात याव्यात. अतिवृष्टी झाल्यास ज्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी आवश्‍्यकतेनुसार कर्मचारी नेमून नागरिकांना सूचना देण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी. तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी सर्व अधिकारीकर्मचारी यांनी वेळोवेळी समन्वय साधावा अशा सूचना या बैठकीत अतिरिक्त आयुक्त 2 श्री. समीर उन्हाळे यांनी दिल्या.