ठाणे,०५ :आधारकार्ड गरजेचे असुन दैनदिन व्यवहारात आधार कार्डला विशेष महत्व आहे. मात्र आधारकार्ड मिळविण्यासाठी लागणाऱ्या वेळखाऊ प्रक्रियेमुळे अनेक नागरिक आधारकार्ड काढण्याबाबत कंटाळा करतात.ही अडचण ओळखून ठाण्याचे आमदार संजय केळकर व भाजप जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील,नंदा पाटील दांपत्य व भाजप शहर चिटणीस सचिन पाटील यांनी गोकुळनगर प्रभाग क्रमांक ११ येथे ०१ मे ते ०७ मे या कालावधीत मोफत आधारकार्ड शिबिर राबवले आहे. या शिबिराला नागरीकांचा उदंड प्रतिसाद लाभत असुन या शिबिराला आ.संजय केळकर यांनी नुकतीच भेट दिली.
ठाणे शहरातील गोकुळनगर येथील ठामपा प्रभाग क्रमांक ११ मधील भाजपचे मा.नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या पाटील हाऊस या जनसंपर्क कार्यालयात सकाळी १० ते सायं. ५ वा. या कालावधीत हे आधार कार्ड शिबिर सुरु आहे. मागील पाच दिवसात तब्बल ५०० नागरीकांनी आधार कार्ड शिबिराचा लाभ घेतला. दर पाच वर्षांनी आपले आधारकार्ड नुतनीकरण करावे लागते. तेव्हा नवीन आधारकार्ड काढण्यासाठी अथवा आधार कार्डमधील काही दुरुस्त्या करण्यासाठी, नागरीकांनी पासपोर्ट, पॅनकार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, विवाह नोंदणी प्रमाणपत्र,शाळा सोडल्याचा दाखला, बँकेचे पासबुक आणि घराच्या अॅग्रीमेंटची प्रत आदी कागदपत्रांसह शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन कृष्णा पाटील यांनी केले आहे.शिबीर यशस्वी करण्यासाठी भाजप मंडल अध्यक्ष विजय रेडेकर, महिला मंडल अध्यक्षा कांचन पाटील, शहर सचीव रुखसाना शेख,राधा मठकर,अश्विनी गायकवाड आणि भाजप युवा मोर्चाचे मंडल अध्यक्ष अक्षय पाटील आदींनी सहभाग घेतला.