Sunday, September 15 2019 3:15 pm

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व आमदार मातोश्रीवर

मुंबई : युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व आमदार मातोश्रीवर हजर राहणार असल्याचे समोर येत आहे.पालकमंत्री व विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना हा निरोप दिला आहे. यावेळी आदित्य ठाकरेंना निवडणुकीत उतरण्याचा विचार आमदार करत आहेत.

येत्या काही दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शिवसेना आमदार एकवटले आहेत. या एकजुटीतून त्यांना योग्य तो संदेश पक्षनेतृत्वापर्यंत पोहोचवायचा आहे, असंही बोललं जात आहे. या आमदारांचं नेतृत्व शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे करताना दिसत आहेत.

शिवसेनेला आगामी मंत्रिमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची चर्चा चालू आहे. मात्र शिवसेनेत उपमुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी सुभाष देसाई यांचं नाव चर्चेत आहे. परंतु सुभाष देसाई यांच्या नावाला काही नेत्यांचा विरोध आहे.

विधानपरिषेदतील शिवसेनेच्या ज्या आमदारांना मंत्रिपदं दिली आहेत, त्यांना पुन्हा संधी देऊ नये, असा संदेश आमदारांनी आपल्या एकजुटीतून दिला आहे. लोकांमधून निवडून आम्ही विधानसभेत गेलो आहोत, मात्र आम्हाला योग्य सन्मान दिला जात नसल्याची भावना या आमदारांमध्ये असल्याचं समोर येत आहे.