Sunday, July 5 2020 9:18 am

“आता मला ठाण्यात राहायचे नाही” – संजीव जयस्वाल

ठाणे :(प्रतिनिधी ) गेल्या तीन वर्षात ठाण्यात विकासकामांचा धडाका लावणाऱ्या पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असताना ठाण्यातील भाजप नगरसेवकांच्या विरोधाच्या भूमिकेमुळे मात्र जयस्वाल कमालीचे अस्वस्थ झाले . गेल्या तीन ते चार महिन्यांपासून माझ्यावर व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप झाले , माझी बदली व्हावी यासाठी प्रयत्न देखील केले गेले , आता माझीच ठाण्यात राहण्याची इच्छा नसून माझ्यावर अविश्वास ठराव आणा असे भावून उदगार संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी झालेल्या सभागृहात काढले आणि संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले . एप्रिल पर्यंत माझी बदली झाली नाही तर मी स्वतःहून सुट्टीवर जाईन असेही पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे . गेल्या तीन वर्षात केलेल्या विकासकामांची हीच पोचपावती का असा प्रश्न देखील त्यांनी सभागृहात उपस्थित केला .
ठाणे महापालिकेत गेल्या काही महिन्यांपासून प्रशासन विरोधात पालिका आयुक्त असे शीतयुद्ध सुरु असून विशेष करून भाजपच्या नगरसेवकांकडून प्रशासनाने मांडलेल्या प्रस्तावाला विरोध होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मुंब्र्याच्या स्टेडियमचा हा मुद्दा चर्चेत आला . मुंब्रा स्टेडियमच्या मुद्द्यावरून मुंब्र्यातील नगरसेवक सभागृहात आक्रमक झाले.आमदार संजय केळकर यांनी पत्र दिल्यामुळे मुंब्रा येथील स्टेडियमचे काम थांबले असा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केल्यानंतर संजय केळकर यांचे पत्र सभागृहात वाचण्यात आले . मात्र कृष्णा पाटील यांनी पत्राची प्रत मिळावी अशी मागणी केल्याने सभागृह नेते नरेश म्हस्के हा प्रशासनावर अविश्वास असल्याचे त्यांनी सांगितले . कृष्णा पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर स्वतः पालिका आयुक्त संजीव जयस्वाल स्वतः जागेवरून उठून सभागृहात निवेदन दिले.संजीव जयस्वाल यांनी पालिका आयुक्त पदाचा पदभार संभाळल्यानंतर पालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयन्त केले.त्यानंतर गेल्या तीन वर्षात त्यांनी ठाण्यात अनेक मोठे आणि महत्वाकांक्षी प्रकल्प राबवाले . मात्र गेल्या तीन ते चार महिन्यांपासून आपल्यावर व्यक्तिगत स्वरूपातील आरोप करण्यात येत असून असल्याचे आयुक्तांनी सभागृहात सांगितले . जयस्वाल यांच्या विरोधात व्हायरल झालेल्या वादग्रस्त क्लिपमुळे देखील ते कमालीचे व्यथित झाले होते.अखेर मंगळवारी झालेल्या महासभेत त्यांनी स्वतःहून जाण्याची इच्छा दर्शवली असून माझ्यावर अविश्वास ठराव आणा असे आवाहन त्यांनी सभागृहात केले.काही वरिष्ठ नेत्यानी मला आश्वासन दिले असल्यामुळेच मी थांबलो असून एप्रिल पर्यंत माझी बदली झाली नाही तर स्वतः सुट्टीवर जाईन असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पालिका आयुक्तांनी मांडलेल्या भूमिकेवर भाजपने त्यांनाच जबादार धरले असून त्यांच्या कार्यपद्धतीमुळेच त्यांना हि नाराजी व्यक्त करावी लागली असल्याची प्रतिक्रिया असल्याची प्रतिक्रिया भाजपचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी यांनी दिली आहे.आयुक्तांकडून विकासकांची बाजी घेण्याचे धोरण राबवण्यात येत असून अनेकवेळा हि बाब मी निदर्शनास आणली असल्याचे पाटणकर यांनी सांगितले.विकास झाला म्हणजे काय झाले हे ठाणेकरांनीच सांगावे . पोखरण रोड नं १ चे आणि २ चे काम अर्धवट आहे . डीजी ठाण्यातला अल्प प्रतिसाद मिळाला आहे.फेरीवाल्यांचा प्रश्न तसाच आहे.मी केवळ तहकुबीवर चर्चा करण्याची मागणी केली होती मात्र ती चर्चा देखील करण्यात आली नाही असे पाटणकर यांनी सांगितले.
पालिकेतील विरोधी पक्ष मात्र आयुक्तांच्या बाजूने उभा राहिला असून त्यांनी त्यांनी भाजप आणि शिवसेना दोघांवर टीका केली आहे . एवढे वर्ष ठाण्यात युतीची सत्ता आहे . मात्र एकही महत्वाकांक्षी प्रकल्प ठाण्यात येऊ शकला नाही असा आरोप विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केला आहे . संजीव जयस्वाल यांनी आयुक्त पदाची सूत्रे सांभाळल्यानंतर ठाण्यात शेकडो प्रकल्प आले . यापूर्वी आयुक्ताना ब्रँड अँबॅसिडर म्हणून आयुक्तांचे नाव पुढे करून त्यांनी केलेल्या विकासकामांवर निवडणूक लढवली . आम्हीच आयुक्तांना आणले म्हणून प्रचार केला मात्र आता त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायची हे योग्य नसल्याची टीका पाटील यांनी भाजपच्या नगरसेवकांवर केली आहे . जयस्वाल यांची बदली झाल्यास अनेक प्रकल्प रखडणार असून ठाण्याचे मोठे नुकसान होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले .