Thursday, November 15 2018 2:50 pm

आता कर्ज फेडणार नाही : नीरव मोदी

मुंबई:पंजाब नॅशनल बँकेला 11 हजार 400 कोटींचा चुना लावणाऱया नीरव मोदींने उलटय़ा बोंबा मारायला सुरू केल्या आहेत. ‘ पीएनबी बँकेने हे प्रकरण सर्वाजनिक केल्यामुळे माझी आणि माझ्या कंपनीच्या ब्रँडची बदनामी झाली आहे. बँकेने कर्ज वसुली करण्याचे सर्व मार्ग बंद केले आहेत.त्यामुळे पीएनबी माझ्याकडून एक छदामही वसूल करू शकणार नाही’,असे नीरव मोदीने पीएनबीला पत्र लिहून म्हटले आहे.तसेच पीएनबीने आपलया कंपन्यांवर असलेले कर्ज वाढून सांगितले असल्याचा दावाही मोदीने केला आहे. पीएनबीला 15-16फेबुवारीला पत्र लिहिण्यात आले.आपल्या कंपन्यांवर पीएनबीचे कर्ज 5 हजार कोटींपेक्षा कमी आहे, असाही दावा नीरव मोदीने केला आहे. नीरव मोदी त्याच्या कुटुंबीयांसह जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ातच देश सोडून पळाला होता. बँकेने कर्जाची रक्क्म वसूल करण्याच्या घाईत माझ्या ब्रँडचा व्यवसाय उद्धवत केला आहे आणि आता कर्ज वसूल करण्याचे सर्व मार्ग बंद केले आहे.असे नीरव मोदीने बँकेला लिहिलेल्या पत्रात म्हटले.