जळगाव, 17 : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे एकीकडे महाविकास आघाडीमध्ये गोंधळाची परिस्थितीत निर्माण झाली आहे.
तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे मागील आठ दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाथाभाऊ अचानक नॉट रिचेबल झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे नेहमी आक्रमकपणे भूमिका मांडत असतात. कार्यकर्ता असो की कुणीही फोन केला तर नाथाभाऊ बोलण्यासाठी हजर असतात.
पण मागील 8 दिवसांपासून एकनाथ खडसे हे नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. पहिल्यांदाच एकनाथ खडसे आठ दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. सर्वसामान्यांचा केव्हाही फोन रिसिव्ह करणारे मात्र पहिल्यांदाच नॉट रिचेबल झाल्याने खडसे समर्थक संभ्रमात पडले आहे.
एकनाथ खडसे हे मुंबईत असल्याचे सांगण्यात येत असून त्यांची तब्येत खराब असून आराम करत असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
मात्र नेहमी संपर्कात राहणारे नाथाभाऊ पहिल्यांदाच नॉट रिचेबल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे. मध्यंतरी एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा रंगली होती. पण एकनाथ खडसेंनी याबद्दल स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. अजितदादांनी सांगितला वंचित-शिवसेना युतीचा फॉर्म्युला दरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतर युतीची चर्चा रंगली आहे.