Sunday, November 18 2018 10:42 pm

आठवडाभर महाराष्ट्र कोरडा राहण्याचे हवामान विभागाचे अंदाज़

 पुणे : उत्तम पावसासाठी महाराष्ट्राला अजून आठवडाभर वाट पाहावी लागेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या आठवडय़ातही महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने हजेरी लावलेली नाही.

महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्ये पावसाने हजेरी लावली होती. मात्र यंदा मान्सून वेळेत दाखल झाला तरी त्याचा जोर आठवडाभरही टिकला नाही. आता महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाने उसंत घेतली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पेरणीच्या तयारीत असलेल्या बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. सामान्यतः 15 जूनपर्यंत पश्चिम आणि मध्य भारतात मान्सून दाखल झालेला असतो. परंतु 11 जून पासून मान्सूनच्या वाऱयांचा प्रभाव कमी झाला आहे. कोकण आणि गोव्यात तुरळक पाऊस होऊ शकतो. मात्र पुढील आठवडाभर महाराष्ट्रातील अन्य भागात पावसाची कोणतीही शक्मयता नाही, असे हवामान खात्याच्या पुणे विभागाकडून सांगण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाडय़ात ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.