Thursday, June 20 2019 2:34 pm

आज वॉरझोन मधली लढत – नमो वि. रागां कोण जिंकणार ही लढत?

मुंबई:- देशातल्या 17 व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. या निकालाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. देशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार की काँग्रेस यावेळी शह देऊन रोखणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींच्या राजकीय कारकिर्दीचे भवितव्य ठरणार आहे. याठिकाणी दोन शक्यता वर्तविण्यात येत आहेत.

 

“भाजप ही निवडणूक जिंकल तर…”

 

या निवडणुकीत जर भाजपला पूर्ण बहुमत मिळाले तर मोदींचा फॉर्म्युला हिट होईल.

भाजपला विजय मिळाला तर त्याचं श्रेय गेल्या वर्षात सरकारने लागू केलेल्या विविध योजनांना दिलं जाईल.

नरेंद्र मोदी हे भाजपचा चेहरा आहेत, भारतीय जनता पक्ष जिंकला तर देशात आणि जगात मोदी हे एक मोठे नेते म्हणून जगासमोर येतील यात शंका नाही.

 

“काँग्रेस जिंकली तर…”

 

काँग्रेस विजयी झाली तर राहुल गांधी यांचा हा सर्वात मोठा विजय मानला जाईल.

राहुल गांधी हेदेखील मोदींप्रमाणे मोठे नेते म्हणून जगसमोर येतील.

 

आज 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशांमधील 542 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले आहे. 39 दिवसात सात टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडली आहे. तब्बल 91 कोटी 1 लाख मतदारांनी आठ हजार 40 उमेदवारांचे नशीब ईव्हीएम मशीनमध्ये कैद केले आहे