Thursday, August 22 2019 3:43 am

आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई -: सीएसएमटी आणि वडाळा रोड ते वाशी, बेलापूर, पनवेल दिशेकडे जाणाऱ्या सर्व लोकल फेऱ्या सकाळी 11 वाजून 34 मिनिटांपासून ते सायंकाळी 4 वाजून 23 मिनिटांपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. याचप्रमाणे वडाळा, वाशी, बेलापूर, पनवेल ते सीएसएमटीच्या दिशेने जाणा-या सर्व लोकल सकाळी 9 वाजून 56 मिनिटांपासून ते संध्याकाळी 4 वाजून 16 मिनिटांपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान रविवारी जम्बो ब्लॉक असेल. सकाळी 10.35 ते 3 वाजून 35 मिनिटांपर्यंत सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडे जाणा-या जलद मार्गावरील काही गाड्या रद्द होतील काही धिम्या मार्गावरून धावतील

पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान तर हार्बर मार्गावर सकाळी 11 ते 4.30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावर रविवारी सकाळी 11 वाजून 40 मिनिटांपासून ते 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे दिशेकडे जाणारी एकही लोकल धावणार नाही. याचप्रमाणे सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून ते संध्याकाळी 4 वाजून 10 मिनिटापर्यंत चुनाभट्टी आणि वांद्रे ते सीएसएमटीच्या दिशेने जाणारी एकही लोकल धावणार नाही.