Tuesday, November 19 2019 3:07 am
ताजी बातमी

आजचा स्वातंत्र्य दिन महत्त्वाचा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :-  ७३ व्या स्वातंत्र्यदिनी जम्मू,श्रीनगर आणि लडाखमध्ये भयमुक्त तिरंगा फडकवण्याची संधी आपल्याला मिळाल्याने आजचा स्वातंत्र्य दिन महत्वाचा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तसेच भारतीय संसदेचे त्यांनी अभिनंदन आणि आभार मानले. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात गेल्या 10-15 दिवसात पूरपरिस्थिती आहे. राज्य शासन, एनजीओ, नेव्ही, आर्मी, तटरक्षक दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ यांनी मेहनत करून पुराच्या तडाख्यातुन बाहेर काढलं. जवळजवळ 5 लाख नागरिकांना बाहेर काढलं यशस्वी काम केलं त्याचा आनंद असल्याचेही ते म्हणाले.

त्याचवेळी मोठं आव्हान ज्यांचे संसार उध्वस्त झाले. त्यांच्या भविष्याची भावीतव्याची चिंता सर्वत्र आहे. शा नागरिकांच्या पाठी भक्कम उभे राहून त्यांना उभं करण्याचं काम महाराष्ट्राला करावं लागेल असे आवाहनही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

शासनाने 6 हजार 800कोटी रुपयांचे भक्कम पॅकेज तयार करून या माध्यमातून पुनर्वसनाचे कार्य वेगाने व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. ज्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला त्यांचे पुनर्वसन रेकॉर्ड वेळेमध्ये करून त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणू हा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संपूर्ण महाराष्ट्र पुरग्रस्तांच्या आणि आमच्यापाठी उभा राहिला यासाठी त्यांनी सर्वांचे आभार मानले.