Tuesday, July 23 2019 2:17 am

आंतरराष्ट्रीय कंडोम दिनानिमित्त एएचएफ इंडिया आणि महाराष्ट्र स्टेट एड्स कण्ट्रोल सोसायटी (एमएसएसीएस) यांचे एकत्रित आयोजन

ठाणे : जगातील ४३हून अधिक देशांतील लक्षावधी रुग्णांना सेवा पुरवणाऱ्या एड्स हेल्थकेअर फाऊण्डेशन (एएचएफ) या जागतिक एड्स संघटनेतर्फे १३ फेब्रुवारी २०१९ रोजी ११व्या आंतरराष्ट्रीय कंडोम दिनानिमित्त (आयसीडी) जगभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. व्हॅलेण्टाईन्स डेच्या पार्श्वभूमीवर हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

एएचएफ इंडियातर्फे या दिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी यंदा ऑलवेज इन फॅशन ही थीम निवडण्यात आली आहे. एचआयव्ही, एसटीडी आणि नको असलेले गर्भारपण या तिन्ही विषयांत जागरुकता निर्माण करण्यासाठी एएचएफ इंडियाने महाराष्ट्र स्टेट एड्स कण्ट्रोल सोसायटी (एमएसएसीएस) या संघटनेशी भागीदारी केली असून या अंतर्गत ठाणे शहरात खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत, मोफत कंडोम वाटप करण्यात आले असून सुरक्षित यौनसंबंधांविषयी जागरुकता निर्माण करणारे कार्यक्रम व उपक्रम आयोजित करण्यात आले.

लोकांना कंडोम्सचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देतानाच सुरक्षित यौनसंबंधांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी मजेशीर व कल्पक मार्गांचा अवलंब आयसीडीने केला. 

ठाण्यातील तलाव पाळी येथील एमसीएस मैदानात कंडोमची ४० फूटांची प्रतिकृती तयार करण्यात आली व कंडोमच्या वापरासाठी लोकांना त्यावर स्वाक्षऱ्या करून प्रोत्साहन देण्यात आले. या कार्यक्रमावेळी एचआयव्ही तपासणी शिबीरतसेचविद्यार्थ्यांतर्फे बॅण्ड कार्यक्रमफ्लॅश मॉब्सफ्लॅश रॅम्प वॉक्स आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पर्ल फॅशन अकादमीच्या फॅशन डिझायनर्सनी कंडोम्सपासून तयार केलेले कपडेडिझाईन्सअॅक्सेसरीज यावेळी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. यातील सर्वोत्कृष्ट डिझाईन्सना बक्षिस देण्यात आले असून कंडोम फॅशन गॅलरीमध्ये या कलाकृती सामान्य लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या.

या सेलिब्रेशनला पाठिंबा देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. यात एकनाथ संभाजी शिंदे (महाराष्ट्राचे माननीय आरोग्य व पीडब्ल्यूडी मंत्री)श्री. राजन विचारे (लोकसभेतील संसदीय सदस्य)डॉ. श्रीकांत शिंदे (लोकसभेतील संसदीय सदस्य). श्री. संजय मुकूंद केळकर (माननीय एमएलए)श्री. राजेश जे. नार्वेकर आयएएस (जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी)श्रीमती मिनाक्षी शिंदे (ठाणे महानगरपालिका महापौर)डॉ. गौरी राठोड (उपसंचालिकाआरोग्य विभाग)श्री. संदीप माळवी (महापालिका उपायुक्त)श्री. रमाकांत गायकवाड (उपसंचालकआयईसी आणि एमएसएमएसएसीएसमुंबई)श्री. रतन पी. गढवे (जिल्हा व्यवस्थापकडीएपीसीयू)डॉ. कैलाश बी. पवार (नागरी शल्यविशारदठाणे नागरी रुग्णालय) आणि एएचएफ इंडियाचे सदिच्छादूत प्रिन्स मानवेंद्र सिंग ही मंडळी उपस्थित होती.

यावेळी बोलताना एएचएफ इंडियाचे कण्ट्री प्रोग्राम संचालक डॉ. व्ही. सॅम प्रसाद म्हणाले, मोफत उपलब्धता, परंपरा आणि संस्कृती याच्या नावावर कंडोमच्या वापराला प्रोत्साहन न देण्याची मानसिकता, कंडोमच्या जाहिराती वा त्यासाठीचा निधी यात काटकसर अशा अनेक कारणांमुळे गेल्या दोन वर्षांपासून भारतात कंडोम्सचा वापर कमी झाला आहे. कालांतराने हेच कारणीभूत घटक कंडोमबाबत लोकांच्या मनात न्यूनगंड निर्माण करतात आणि सामान्य किंवा विवाहोत्तर यौनसंबंधांमध्ये कंडोम्समुळे येणारी सहजता हळूहळू कमी होऊ लागते. आपल्या सरकारच्या बदलत्या धोरणांमुळे तसेच, या विषयातील गुंतागुंतीमुळे इतकी वर्षे कंडोमच्या वापरासाठी जागरुकता निर्माण करण्याकरिता घेतलेले कष्ट व मेहनत फुकट जाऊ शकते. अशाने एसटीआय (यौनसंबंधातून संक्रमित होणारे रोग), एचआयव्ही-एड्स किंवा नको असलेल्या गर्भारपणाचे प्रमाण वाढण्याचे धोके निर्माण होतात. आंतरराष्ट्रीय कंडोम दिन भारतात राष्ट्रीय कंडोम दिन म्हणून साजरा केला पाहिजे, तसेच, सध्याच्या एनएसीओ उपक्रमासोबतच कंडोमच्या वापरासाठी प्रोत्साहन देणारे राष्ट्रव्यापी उपक्रम आयोजित करण्याची देशाला नितांत गरज आहे.

या कार्यक्रमादरम्यान, एएचएफतर्फे २०१९च्या आंतरराष्ट्रीय कंडोम दिनाचे थीम गीतही सादर करण्यात आले. ऑलवेज इन फॅशन या थीमवरील आय लाईक इट लाईक दॅट हे गीत जगभरातील आयसीडी कार्यक्रमांना प्रोत्साहन देणारे होते. 

एचआयव्ही एड्स संक्रमणाबाबत बोलताना भारतातील एलजीबीटीक्यूआयए समुदाय लक्षत घेणे फार महत्वाचे ठरत असले तरीही, भारतातील कंडोम्सचा कमी होत जाणारा वापर या रोगांना आणखी आमंत्रण देतो. ३७७ कलमांतर्गत समलिंगी संबंधांकडे आता गुन्हा म्हणून पाहता येत असून कंडोम्सचा वापर करून या नात्यातील धोके कमी करणे ही काळाची गरज बनली आहे. भारतासारख्या मोठ्या देशाच्या कानाकोपऱ्या कंडोम्स सहज उपलब्ध व्हावेत, ही खरेतर धोरणकर्त्यांची जबाबदारी आहे. आंतरराष्ट्रीय कंडोम दिनाचे सेलिब्रेशन कंडोमच्या सातत्यपूर्ण वापरावर भर देते, असे एएचएफचे सदिच्छादूत प्रिन्स मानवेंद्र सिंग गोहील म्हणाले.

एएचएफच्या जागतिक धोरण विभागप्रमुख व सल्लागार टेरी फोर्ड म्हणाल्या, एचआयव्ही आणि एसटीडी तसेच, नको असलेले गर्भारपण रोखण्यासाठी कंडोम्स अद्याप सर्वांत स्वस्त व सर्वोत्कृष्ट उपाय आहेत. स्वतःला व आपल्या प्रियजनांनासुरक्षित आणि आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठी लोकांना एकत्र आणून माहिती देण्याकरिता आयसीडीचे कार्यक्रम आम्ही मजेशीर पद्धतीने साजरे करत आहोत. एचआयव्ही समस्या जगात अद्यापही मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे, हे लोकांना पटवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कंडोम दिन फार महत्वाचा ठरत असून ऑलवेज इन फॅशन ही मोहीम लोकांमध्ये याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी फारच उपयुक्त ठरत आहे.

भारतात एचआयव्हीपिडीत रुग्णांची संख्या २१ लाखांहून अधिक असून एकट्या महाराष्ट्रातच .३० लाखांहून अधिक रुग्ण पीएलएचआयव्ही बाधित आहेत. म्हणूनच, लोकांना सुरक्षित यौनसंबंधांविषयी जागरुक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. आपल्याही समाजात लैंगिकतेविषयी सतत बदलत्या कल्पना जन्माला येत असल्यामुळे कंडोमविषयी लोकांना माहिती देणे महत्वाचे ठरते. पारंपरिक लैंगिकतेपासून आपण खूप पुढे आलो असून आता भारतातील ग्रामीण भागातही केमसेक्स आणि बेअर बॅकिंगसारखे फॅशन ट्रेण्ड्स वाढू लागले आहेत. 

एएचएफचे अध्यक्ष मायकल विनस्टीन म्हणालेगेली अनेक वर्षे जागतिक आरोग्य क्षेत्रातील निधीउभारणी कमी झाली असताना सुरक्षित यौनसंबंधांविषयी जागरुकता निर्माण करण्याची नितात आवश्यकता भासते आहे. निधीच्या तुटवड्यामध्ये कंडोम्ससाठीचा अपुरा पैसाही अंतर्भूत असून एचआयव्ही रुग्णांची अधिक संख्या असलेल्या देशांमध्ये तरी रोगमुक्त व आरोग्यपूर्ण जीवनासाठी कंडोम्स किती महत्वाचे ठरतात, हे लोकांना समजावून सांगणे महत्वाचे ठरले आहे.