Thursday, December 12 2024 8:37 pm

आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सुरक्षागृह

मुंबई, 05 : मुंबई उपनगर जिल्ह्यात आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनातर्फे सुरक्षा गृह पुरवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी.एच.नागरगोजे यांनी दिली.

सुरुवातीला एक महिन्यासाठी नाममात्र शुल्कावर सुरक्षागृह उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जास्तीत – जास्त एका वर्षापर्यंत सुरक्षागृह उपलब्ध करून देण्यात येईल. या सुरक्षागृहाची व्यवस्था समाज कल्याण विभागामार्फत पुरवण्यात येणार आहे. उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

तरी ऑनर किलींग प्रकरणात त्रस्त असणाऱ्या जोडप्यांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे.