Tuesday, July 23 2019 2:48 am

अहमदनगरमध्ये भाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांची हक्कलपट्टी

अहमदनगर-: अहमदनगरच्या निवडणुकीची चर्चा जोर धरत असताना, महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांना राष्ट्रवादीने जोरदार दणका दिला आहे. या 18 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादीने केली आहे. तसंच शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनाही पदावरून हटवण्यात आल्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

शिवसेना हा मोठा पक्ष असला तरी इतर सर्वपक्षीयांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यात राष्ट्रवादीच्या संपत बरस्कार यांनी आपला अर्ज मागे घेतला होता. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे भाजपने ही महापौरपदाची निवडणूक जिंकली होती.राष्ट्रवादी नगरसेवकांच्या या पाठिंब्यामुळे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वच नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे, पक्षनेतृत्वाचा विरोध असतानाही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी महापौर निवडणुकीत भाजपला साथ दिली. या प्रकरणी जयंत पाटलांनी आधीच नगरसेवकांना नोटीस बजावली होती. अखेर या 18 नगरसेवकांची थेट पक्षातून हकालपट्टी केली.