Monday, April 19 2021 12:03 am

असल्या पोरकट विधानावर बोलून मी कशाला वेळ घालवू? -राऊत म्हणाले.

मुंबई -:  शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, सोनू निगम यांना मारण्याचा आदेश कुणी दिला होता, असे प्रश्न उपस्थित करत राणे यांनी थेट ठाकरे घराण्यांवरच आरोप केले आहेत. या आरोपांना शिवसेनेकडून आ. विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, नीलेश राणे अनेकदा शुद्धीत नसताना काहीही बरळत असतात. जर अशी विधाने नारायण राणे यांनी केली असती तर त्यांना शिवसेना काय आहे हे कळाले असते. मात्र, या असल्या पोरकट विधानावर बोलून मी कशाला वेळ घालवू? असेही राऊत म्हणाले.
खा.राणे यांना स्वतंत्रपणे कोकणातील जागा देऊन त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीत घेण्याचे राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार हालचाली करत असल्याच्या कुणकुणीमुळेच खा. नारायण राणे यांना भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या जाहीरानामा समितीत घेत त्यांची राजकीय कोंडी केल्याची चर्चा विरत नाही, तोच नीलेश राणे यांनी वादग्रस्त टीका केली. खा. राणे यांच्या जाहीरानामा समितीवरील नियुक्तीवर शिवसेनेत नाराजी होतीच. आता त्यात या विधानामुळे आणखी कटूता निर्माण झाली आहे. जर तुम्हाला राणे प्रेम ठेवायचे असेल तर ते तुमचे तुम्हाला लखलाभ, असा टोलाही त्यांनी लगावला.