Friday, September 25 2020 11:56 am

अर्थसंकल्पात भारतीय चित्रपटातील निर्मात्यांना मोठा दिलासा

नवी-दिल्ली-: अर्थसंकल्पाच्या भाषणात पियूष घोयल यांनी भारतीय चित्रपटातील निर्मात्यांना मोठी सूट दिली आहे. त्यांनी सांगितले की, चित्रपटाचे चित्रीकरण करताना विदेशी चित्रपटांप्रमाणे सिंगल विंडो क्लिअरन्स मिळेल. तसेच सिनेमागृहातून चित्रपटाच्या प्रिंट चोरीच्या समस्यांवर तोडगा म्हणून सध्याच्या छायाचित्रण कायद्यात अँटी-कॅमकोडिंग तरतुदी आणणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सिनेमागृहाच्या टिकीटांवर लागणारी १२% जीएसटी देखील कमी करण्याचा सरकार विचार करत आहे, परंतु यावर जीएसटी परिषद निर्णय घेईल असे त्यांनी भाषणात सांगितले.

गेल्याच महिन्यात बॅालीवूड मधील काही कलाकार व दिग्दर्शक काही दिवसाआधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती. या भेटीत सिनेमागृहाच्या तिकिटांवर लागणारा १२% जीएसटी कर कमी करण्यासाठी विनंती केली होती. तसेच मनोरंजन विश्वातल्या अनेक विषयांवर चर्चा झाली होती. त्याचाच फायदा अर्थसंकल्पात दिसून आला.