Wednesday, February 26 2020 10:26 am

अमित ठाकरेची मनसेच्या नेतेपदी निवड

मुंबई : ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य सक्रीय राजकारणात सहभागी झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे  आहे. अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरेची   घोषणा केली. यावेळी अमित ठाकरे यांच्या आई शर्मिला ठाकरे, पत्नी मिताली ठाकरे, बहिण उर्वशी, आजी कुंदाताई ठाकरे उपस्थित होत्या. परंतु राज ठाकरे मात्र मंचावर उपस्थित नव्हते. ते एका खोलीत बसून हा प्रसंग पाहत होते.

अमित राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेपदी निवड करत आहोत, अशी घोषणा बाळा नांदगावकर यांनी केली. त्यानंतर मनसेच्या विद्यार्थी सेनेतर्फे शाल आणि तलवार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमस्थळी टाळ्यांच्या कडकडाटात एकच जल्लोष झाला. नेतेपदी निवड झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी शिक्षणाचा ठराव मांडला. अमित यांच्या  नेतेपदीच्या  निवडची  घोषणा झाल्या, त्यांच्या आई तसंच पत्नीचे डोळे पाणावले होते.