Tuesday, July 14 2020 11:01 am
ताजी बातमी

अमरनाथ यात्रेमध्ये दहशतवादी हल्ल्याची भीती;४ ऑगस्टपर्यंत अमरनाथ यात्रा मार्ग बंद करण्याचा निर्णय

  अमरनाथ   – दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा बंद करण्याचे आदेश  जम्मू-काश्मीर सरकारकडून  देण्यात आले आहे.  ४ ऑगस्टपर्यंत अमरनाथ यात्रा मार्ग बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला असून अमरनाथ यात्रेकरूंना परतण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ यात्रेवर असलेल्या भाविकांनी शक्य तितक्या लवकर निघून यावे, अशी विनंती प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे.
अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे, अशी खात्रीशीर माहिती दिल्यानंतर अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. सुरक्षादलांकडून अमरनाथ यात्रेकरूंवर होणारा हल्ला परतवून लावण्यात आला आहे, अशी माहिती लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

अमरनाथ यात्रेच्या मार्गावर सुरक्षारक्षकांनी  एका ठिकाणाहून अमेरिकन स्नायपर रायफल एम-२४ जप्त करण्यात आली आहे तर काही ठिकाणी भूसुरुंग लावलेले आढळून आले. आतापर्यंत पकडण्यात आलेल्या किंवा मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी ८३ टक्के लष्करावर दगडफेक करणारे तरुण असल्याचे आढळून आले आहे. सुरुवातीला ५०० रुपये घेऊन तरुण मंडळी दगडफेक करतात आणि नंतर दहशतवादी होतात. त्यामुळे सर्व माता-भगिनींना आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन ढिल्लन यांनी यावेळी केले.