Thursday, June 20 2019 2:35 pm

अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्येप्रकरणी दोघांना तिहेरी जन्मठेप

मुंबई : अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्येप्रकरणी दोन्ही दोषींना तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमित जयस्वाल आणि प्रिती सुरीन यांना मुंबई सत्र न्यायलयाने तिहेरी जन्मठेप सुनावली असून ही शिक्ष्घ एकत्रच भोगायची आहे.अमित जयस्वाल आणि प्रीती सुरीन यांनी अतिशय थंड डोक्मयाने 2012 मध्ये मीनाक्षीची निर्घृण हत्या केली होती. मीनाक्षीच्या देहाची ओळख पटू नये यासाठी दोघांनी तिचे डोकं धडापासून वेगळं केलं. त्यानंतर तिचं धड आणि शीर दोन वेगळवेगळय़ा ठिकाणी नेऊन टाकले.मीनाक्षी थापा हत्याकांडप्रकरणी अमित जयस्वाल आणि प्रीती सुरीन या दोघांना मुंबई सत्र न्यायालयाने आयपीसी कलम 302, 361(अ), 120(बी), 201 आणि आयटी ऍक्ट अंतर्गत दोषी ठरवलं होतं.