Sunday, March 24 2019 12:40 pm

अभिनेता जॉन अब्राहमविरोधात मुंबईत गुन्हा

मुंबई :‘परमाणु :  द स्टोरी ऑफ पोखरण’ या सिनेमामुळे अभिना जॉन अब्राहमच्या अडचणी वाढल्य आहेत. चित्रपट निर्माती प्रेरणा आरोराने जॉनविरोधात मुंबईच्या खार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

प्रेरणा अरोराची क्रिअर्ज प्रॉडक्शन हाऊस कंपनीने जॉन अब्राहमविरोधात फसवणूक, पैशांची अफरातफर, कॉपीराईटचं उल्लंघन या गुह्यांची नोंद केली आहे. जॉनने सिनेमाच्या नफ्याचा 50 टक्के भाग घेतल्यानंतर करार रद्द केला आहे, असा आरोप प्रेरणा अरोराने केला आहे. या प्रकरणात पोलिस लवकरच जॉनची चौकशी करण्याची शक्मयता आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा टळली आहे.