Sunday, November 18 2018 10:15 pm

अभिनेता इरफान खानला न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खानला न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर झाल्याचं निदान झालं आहे. खुद्द इरफाननेच ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. मार्गारेट मिशेल यांचा कोट पोस्ट करुन इरफानने आपल्या आयुष्याचं अस्ताव्यस्त झालेलं चित्र चाहत्यांसमोर व्यक्त केली आहे .’आपण अपेक्षा करतो, ते देणं आयुष्यासाठी बंधनकारक नाही’ या आशयाचा मार्गारेट मिशेल यांचा कोट इरफानने पोस्ट केला आहे. त्यानंतर ‘न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर’चं निदान झाल्याची माहिती इरफानने दिली आहे।

 

अनपेक्षित गोष्टींमुळे आपली वाढ होते. गेल्या काही दिवसात तेच घडत गेलं. मला ‘न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर’ झाल्याचं समजलं. सध्या तरी कठीण झालं आहे. पण माझ्यासोबत असलेल्या व्यक्तींचं प्रेम आणि सामर्थ्यामुळे माझ्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे. मला  उपचारांसाठी परदेशात जावं लागणार आहे. मला शुभेच्छा पाठवत राहा, अशी विनंती करतो. न्यूरो म्हणजे प्रत्येक वेळी मेंदूशी संबंधित नाही, हेच उत्तर मी अफवांना देईन. गूगल करणं हा संशोधनाचा सोप्पा मार्ग आहे. ज्यांनी माझ्या शब्दाखातर वाट पाहिली, त्यांना आणखी किस्से सांगण्यासाठी मी परत येईन, हीच आशा ‘असं इरफानने लिहिलं आहे.