Sunday, September 15 2019 3:55 pm

अबकी बार पुन्हा मोदी सरकार?

मुंबई :- 2019 च्या लोकसभा निवडणूक या 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश यतीन एकूण 542 लोकसभा मतदारसंघात पार पडली. आज या निवडणुकीचे भवितव्य देशाला समजणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे येणारे निकाल पाहता यावेळीही पुन्हा एकदा भाजप सत्तेत येणार असेच वाटते आहे. जर असे झाले तर सर्वसामान्य जनतेचा भाजप आणि पर्यायाने मोदींच्या कामांवर विश्वास आहे असे सिद्ध होईल. यातून मोदींनी केलेला प्रचार हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे दिसून येते, मोदी हे कसे योग्य हेच यातून समोर येते आहे.
पण येथे एक गोष्ट ठळकपणे दिसून येईल की जर भाजपा जिंकून सत्तेत आली तर मग काँग्रेसकडून प्रचार केला गेला होता त्याचा काहीच फायदा का नाही झाला. राज ठाकरे यांची भाषणे पाहता यावेळी मोदी हरणार हेच सर्वांना वाटत होते. तसेच एक्झिट पोलचे निकाल सुद्धा भाजपा 2014 पेक्षा कमी ठिकाणी येईल असेच सांगत होते मग आता अचानक हे सर्व चुकीचे कसे ठरले. राज ठाकरेंनी केलेली भाषणे आणि लाव रे तो व्हिडिओचे काय झाले? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येत आहेत.