Tuesday, July 23 2019 2:02 am

अपहरण करणारा गजाआड

नाशिक-: नाशिकच्या चोपडा लॉन्स परिसरातील कैलास गणपतराव जाधव यांचा इयत्ता अकरावीत शिकणारा सतरावर्षीय मुलगा 5 फेब्रुवारीला सकाळी साडेसात वाजता कॉलेजला जातो, असे सांगून घराबाहेर पडला. सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने नातलगांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्याचा थांगपत्ता लागला नाही. यानंतर त्याच्या वडिलांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले, पोलिसांना माहिती दिली.याचदरम्यान कैलास जाधव यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने धमकी दिली की, तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे, दहा लाख रुपये द्या आणि त्याला सुखरूप घेऊन जा. यानंतर त्याचे अपहरण झाल्याची खात्री पटल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध मोहीम सुरू केली. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी गुन्हे शाखा व सरकारवाडा पोलिसांचे संयुक्त पथक निर्माण करून शोध सुरू केला.

पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी, हवालदार रवींद्र बागुल, यमाजी महाले, वसंत पांडव, आसिफ तांबोळी, दिलीप मोंढे, गणेश वडजे, विशाल देवरे, राहुल पालखेडे, प्रवीण चव्हाण, स्वप्नील जुंद्रे यांच्या पथकाचे या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांनी अभिनंदन केले आहे.