Tuesday, November 19 2019 3:07 am
ताजी बातमी

अपंग दाखल्यांसाठी अपंगांची फार मोठी गैरसोय

ठाणे :-  आज ठाणे  सिव्हिल हॉस्पिटल येथे अपंग दाखल्यासाठी तीन महिने अगोदर वेळ देऊनही सर्वर बंद असल्याची सबब सांगून खाजगी एजंट मार्फत तीनशे ते पाचशे रुपये खर्च करून फॉर्म भरण्यात आले. ऑनलाइन फॉर्म भरून देखील  अपंगांच्या मेडीकल चाचण्या घेण्यात आल्या नाहीत. अपंगत्व असलेले हे सर्वजण ठाण्यातील ग्रामीण भागातून आलेले, काही अक्षरशहा पॅरलेसिस झालेले पेशंट  रिक्षा व इतर वाहनातून घेऊन आलेले, वयोवृद्ध , डायबेटिस सारखा आजार असलेले असतानादेखील त्यांना पुढील तारखेला या असे सांगण्यात येत होते ऑनलाईन सर्वर डाऊन च्या या समस्येमुळे हातावर पोट असलेले कित्येक जण कामावर सुट्टी घेऊन सिविल हॉस्पिटल ला अनेक आढवड्यापासून येत आहेत असे निदर्शनास आले व या बाबत चा अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने आज ठाणे काँग्रेस अध्यक्ष मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे  काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे  सिविल हॉस्पिटलचे CMO डॉ देशमुख यांची भेट घेण्यात आली अशा पद्धतीने प्रत्येक वेळी सर्व बंदचे कारण देऊन गरीब रुग्णांना तीनशे ते पाचशे रुपये मोजावे लागणार असतील तर ते अत्यंत चुकीचे आहे हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले व ठाणे जिल्ह्यातील दूरवरच्या भागातून आलेल्या व तिथे हजर असलेल्या अनेक अपंगांच्या चाचण्या डॉक्टरांच्या मार्फत करून घेण्यात आल्या पुन्हा  अशा प्रकारची वागणूक गोरगरीब अपंग रुग्णांना मिळणार असेल तर ठाणे शहर काँग्रेसला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल यावेळी पप्पू मोमीन, लोकेश घोलप, अंकुश खरे, संजय बागल ,संदीप लबडे आदी पदाधिकारी हजर होते