Saturday, June 14 2025 5:06 pm

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, 02 : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मंत्री श्री. झिरवाळ यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.