Sunday, July 5 2020 9:56 am

अज्ञात व्यक्तींनी मोदींचे पोस्टर फाडल्याने तणाव

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी व नविन निवडुन आलेले खासदार डॉ. सुजय विखे व खा. सदाशिव लोखंडे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या विजया निमित्ताने लावलेले पोस्टर काही अज्ञात व्यक्तींनी फाडले असल्याची घटना संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे घडली.

 

भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांनी घुलेवाडी गाव बंद ठेवत निषेध व्यक्त केला असून गावात तणाव निर्माण झाला आहे. बॅनर फाडण्याच्या प्रकार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात घडल्याने निवडणूक निकालानंतर राजकीय संघर्ष तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे