Friday, May 24 2019 7:48 am

अखेर मोदींनी पत्रकार परिषद घेतली

नवी दिल्ली : अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ची हि पहिलीच पत्रकार परिषद होती. परंतु या परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे हि भाजपा  अध्यक्ष अमित शहा यांनीच दिले,

मोदींनी प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही, असे अमित शहा यांनी म्हंटले.
पत्रकांनी मोदींना विचारलेले प्रश्न हे मोदींनी अमित शहा यांच्या कडे फिरवले 
‘मी पक्षाचा शिस्तप्रिय सैनिक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पक्षाचे अध्यक्ष म्हणून शहाच देतील,’ असं मोदी म्हणाले. त्यानंतर पुन्हा एकदा एका पत्रकारानं एका प्रश्नावर मोदींची प्रतिक्रिया विचारली. त्यावर प्रत्येक प्रश्नाला पंतप्रधानांनी उत्तरं देण्याची आवश्यकता नाही, असं शहांनी म्हटलं.
  नथुराम गोडसे हा राष्ट्रभक्त होता, असा दावा  प्रज्ञा ठाकूर हिने केला आहे. असा प्रश्न मोदींना विचारल्यावर प्रज्ञा ठाकूर हिने माफी मागितली तरी तिला माफ करणार नाही असे मोदी म्हणाले व याचा निर्णय अनुशासनात्मक कमिटी घेणार असल्याचे सांगितले.
भाजपाच्या पत्रकार परिषदेला अमित शहांनी सुरुवात केली. त्यांनी मोदी सरकारच्या योजनांची विस्तृत माहिती दिली. यानंतर मोदींनी पत्रकारांशी बोलण्यास सुरुवात केली. ‘आधी माझं हेच काम असायचं. संध्याकाळी पक्ष कार्यालयात यायचं. पत्रकार मित्रांशी संवाद साधायचा. आज दिवसभर मध्य प्रदेशात होतो. त्यामुळे येण्यास उशीर झाला,’ असं मोदी सुरुवातीला म्हणाले. लोकसभा निवडणूक सुरू असताना आयपीएल, रमजानदेखील झाला. हीच लोकशाहीची ताकद असल्याचं मोदींनी म्हटलं.  आम्ही सकारात्मक दृष्टीकोनातून निवडणुकीला सामोरे गेलो. जनता पुन्हा एकदा बहुमत देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकाच पक्षाचं बहुमताचं सरकार केंद्रात सत्तेत पुन्हा येणार, हे कित्येक वर्षांनंतर देशात घडेल, असंदेखील ते पुढे म्हणाले. देशातल्या जनतेनं गेल्या पाच वर्षांत कायम साथ दिली. अनेक चढ-उतार आले. पण देश कायम सरकारच्या पाठिशी राहिला, असं म्हणत मोदींनी देशवासीयांचे आभार मानले.