Tuesday, July 23 2019 2:36 am

अखेर काय आहे, VVPT जाणून घ्या !

भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. लोकशाही म्हणजे लोकानी लोकांसाठी तयार केलेलं साम्रज्य होय. लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं VVPAT मशीन्स चर्चेत आहेत. EVM मशीन्सबद्दल वादविवाद सुरू असतानाच VVPAT वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानं येणाऱ्या निवडणुका गाजण्याची चिन्हं आहेत. VVPAT मशीन्स नेमकं काय करतात याचा घेतलेला आढावा.

 VVPAT म्हणजे काय ?

‘Voter Verifiable Paper Audit Trail’ म्हणजे VVPAT.

मतदार एका विशिष्ट उमेदवाराला मतदान करतो. मतदारानं ज्या उमेदवाराला मत दिलं आहे; ते मत त्याच उमेदवाराला मिळाले आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी VVPAT वापरलं जातं.