Monday, June 17 2019 4:56 am

अकोला येथे ११ सिलेंडरचा स्फोट ; अनेक झोपड्या भस्मसात

अकोला : गुरुवारी शहरात ११ सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागून ६० च्या आसपास झोपड्या भस्मसात झाल्याची घटना घडली. याच दरम्यान झोपडयांमध्ये असणाऱ्या इतर १५ सिलेंडर सुरक्षित ठिकाणी हलविल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्याजवळ असलेल्या माता नगर झोपडपट्टीतील एका घरातील सिलिंडरला अचानक गळती सुरू झाली. काही वेळात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे घरासह कुडाच्या भिंतींना व लाकडांना आग लागली. आग पसरून लगतच्या झोपडय़ांनाही लागली. त्या आगीमुळे जवळच्या घर व झोपडय़ांमधील तब्बल ११ सिलिंडरचा स्फोट झाला.यानंतर तातडीने पोलिसांना कळवण्यात आले. तसेच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले तब्बल ४ तासानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.