Tuesday, November 19 2019 3:52 am
ताजी बातमी

अंधेरी स्टेशनजवळ पुलाचा काही भाग कोसळला ,पश्चिम रेल्वे ठप्प ,६ जण जखमी

मुंबई :अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने मंगळवारी सकाळी पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. सकाळी साडे सातच्या सुमारास ही घटना घडली असून या दुर्घटनेत ६ जण जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या दुर्घटनेमुळे विरारवरुन चर्चगेट आणि चर्चगेटवरुन विरारच्या दिशेने येणाऱया गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. भर पावसात पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा ठप्प झाल्याने कामावर निघालेल्या प्रवाशांचे हाल होत आहेत.

मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमारास अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱया पुलाचा काही भाग कोसळला. सुदैवाने त्यावेळी खालून लोकल टेन जात नसल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरु आहे. या दुर्घटनेत ओव्हरहेड वायरचेही नुकसान झाले असून वाहतूक कधी पूर्ववत होईल, हे अद्याप समजू शकलेले नाही.पावसामुळे या कामात अडथळे येत आहेत.ह्या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश पश्चिम रेलवे च्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.प्रवाश्यांसाठी अंधेरी ते बोरीवली आणि विरार येथे विशेष बेस्ट बस च्या गाड्या सोडण्यात आल्या आहेत.