Tuesday, July 23 2019 2:32 am

अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध – अध्यक्ष मंजुषा जाधव

ठाणे : जिल्ह्याच्या दुर्गम भागात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उत्तम काम करत असून त्यांना निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद कटिबद्ध असल्याची भावना जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव यांनी व्यक्त केली. महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आज एन. के. टी कॉलेज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या उत्कृष्ट अंगणवाडी सेविका व मदतनीस पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर महिला व बाल कल्याण समिती सभापती दर्शना करसन ठाकरे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, कृषी,पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती उज्वला गुळवी, कल्याण पंचायत समिती सभापती टेंभे , जिल्हा परिषद सदस्य सुषमा लोणे, वैशाली चंदे, दिपाली झुगरे, शाम पाटील, रेखा कंठे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा ) चंद्रकांत पवार, पशुसंवर्धन अधिकारी लक्ष्मण पवार आदी मान्यवर  उपस्थित होते.

          प्रास्ताविक करताना महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले म्हणाले की, जिल्हास्तरावर हा विभाग अगदी लहानसा व कमी क्षमतेचा जरी दिसून येत असला तरी प्रत्येक गावात आमच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, सुपरवायझर काम करत असतात. त्यांच्यामाध्यमातून आम्ही शून्य ते सहा  वयोगटातील बालकांसह महिला व किशोर वयीन मुलींसाठी विविध उपक्रम व योजना राबवित असल्याचे भोसले यांनी सांगितले.

         या कार्यक्रमा दरम्यान थिएटर ऑफ रिलेवंस संस्थेच्या सायली पावसकर, अश्विनी नांदेडकर, कोमल खांबकर, तुषार म्हस्के  यांनी  मै औरत हू ही लघू नाटिका सादर करण्यात आली. या कार्यक्रमाचे खुमासदार शैलीत पूजा माऊसकर-वडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

   

पुरस्कार प्राप्त अंगणवाडी सेविका

श्रीम.मेबल जोकिम टप्पा, श्रीम.सिताबाई सिताराम घागस,श्रीम. योगिता अविनाश जाधव, श्रीम.दिपा दिनेश राऊत, श्रीम.कुंदा जयराम मुरेकर, श्रीम.रेश्मा संतोष घुडे श्रीम.जयश्री जगन्नाथ व्यापारी, श्रीम.चंदा मथूर‍ म्हात्रे, श्रीम.छाया पुंडलिक मिरकुटे,

 

पुरस्कार प्राप्त अंगणवाडी मदतनीस

मदतनीस श्रीम.सुरेखा अशोक लोंढे, श्रीम.मंजुळा सखाराम धापटे,श्रीम.भावना मेणनाथ भोईर, श्रीम.बारकूबाई  मोतीराम भोईर, श्रीम.रंजना महेंद्र खंडवी, श्रीम.कविता राजाराम घागस, श्रीम. चंद्रभागा गणपत कुलाल, श्रीम.पुष्पा निरगुडा, श्रीम.रेखा संतोष पाटील.